“ तान्हाजी “ चित्रपटाचा मराठी ट्रेलर पाहाच ।

0
137
tanhaji

“ तान्हाजी “ चित्रपटाचा मराठी ट्रेलर पाहाच । 

मुंबई: 

स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या शोर्याची गाथा मोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या “तान्हाजी : द अनसग वॉरिअर “ या चित्रपटाची उत्सुकता फॅन्सना लागून राहिली असताना चित्रपटाचा मराठी ट्रेलर रिलीज करण्यात आला. 

‘’ जसा मातीचा प्रत्येक कणात एक पर्वत असतोय, प्रत्येक बीमध्ये एक जंगल , प्रत्येक  तलवारीत एक सेना …. तसाच प्रत्येक मराठ्यांत दडला आहे लाख मराठा…… ‘ असा दमदार चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये ऐकावयास मिळतो. 

 

कोंढाणा किल्ला सर करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली होती. आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेऊन, तानाजी मालुसरे कोंढाणावर स्वारी करण्यास सज्ज झाले होते. ‘ आधी लगीन कोंढाण्याच , मग माझ्या रायबाचं ‘ अशी गर्जना करत तानाजी मालुसरे कोंढाणा मोहीम फत्ते करण्यासाठी गेले. आपल्या पराक्रमाच्या जोरावर मावळ्यांनी हा किल्ला जिकलदेखील , पण शत्रुचा सामना करताना ते धारातीर्थी पडले. 

  • तान्हाजी चित्रपट १० जानेवारी २०२० ला एकाच दिवशी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे.