सौरव गांगुलीची मोठी घोषणा : टीम इंडिया चार देशाची वन डे सुपर सीरिज खेळणार

0
85
saurav

सौरव गांगुलीची मोठी घोषणा : टीम इंडिया चार देशाची वन डे सुपर सीरिज खेळणार 

भारतीय संघानं २०१९ च्या वर्षाची सांगता विजयाने केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला व मालिका २-१ अशी खिशात घातली. २००७ पासून ते आत्तापर्यंत टीम इंडियानं सलग दहा वनडे मालिकेत वेस्ट इंडिजला पराभूत करून वेगळा विक्रम नावावर केला. यापूर्वी टीम इंडियानं सलग नऊ वन डे मालिकांमध्ये श्रीलंकेला पराभूत केलं होत. टीम इंडिया २०२० मध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांचा सामना करणार आहे. परंतु, भारतीय नियामक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तसेच भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या मनात काही वेगळेच प्लान आहे. गांगुली चार देशात वन डे सुपर सीरिज खेळण्याच्या विचारात आहे. 

२०२१ सुरवातीला चार देशांची वन दे सुपर सीरिज मालिका खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याची ,माहिती  सौरव गांगुली यांनी दिली. या मालिकेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया,आणि आणखी एक अव्वल संघ खेळेल, असं गांगुलीने सांगितलं. या मालिकांची सुरुवात २०२१ च्या सुरुवातीला होईल आणि भारतात खेळवण्यात येईल. 

या बाबत गांगुली आणि बीसीसीआयचे सदस्य इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डशी चर्चा करण्याकरिता काही दिवसापूर्वी इंग्लंडमध्ये गेले होते. गांगुलीसोबत खजिनदार अरुण सिग धुमाळ व सचिव जय शाह हेही होते गांगुली म्हणाल. “ इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळासोबत आमचे चागले संबंध आहेत. आणि बैठक हि चांगलीच संपन्न झाली. 

असे  जरी असले तरी आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद तीन पेक्षा अधिक वन डे मालिकेला मान्यता देत नाही. त्यामुळे गांगुलीच्या संकल्पनेतील मालिका झाल्यास तो एक इतिहासच ठरेल.