दहशतवाद पसरवणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी आणा: काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी

0
59
दहशतवाद पसरवणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी आणा: काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी.
 नवी दिल्ली : राज्यात शिवसेना-काँग्रेस – राष्ट्रवादी सरकार आल्यानंतर अनेक मागण्यांना जोर येऊ लागला आहे. अशातच सनातन संस्थेबाबतही सरकारने भूमिका घ्यावी , दहशतवाद पसरविण्याच काम सनातन करते. मालेगाव दंगलीत सर्व पुरावे असताना प्रज्ञा ठाकूरला भाजपने खासदार केले हे अतिशय वाईट बाब आहे. दहशतवाद पसरविणारा कोणताही समाजाचा असो त्याला शिक्षा व्हायला हवी. सनातन संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी हुसेन दलवाई, यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 
याबाबत बोलताना हुसेन दलवाई एबीपी माझाशी बोलताना म्हणाले कि, नाणार , आरे आंदोलकासोबत सरकारने घेतलेले निर्णयाने आनंद झाला. भीमा-कोरेगाव प्रकरणातील काही जणांना गोवण्याचे काम सुरु आहे. त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे या दोघचा सहभाग भीमा-कोरेगाव मध्ये होता. त्याच्यामुळेच दंगली घडल्या. सांगलीच्या दंगलीवेळी जयंत पाटील यांनी भिडेंची बाजू घेतली होती. त्यामुळे मी जयंत पाटलांनी भिडेंची बाजू घेऊ नये असं सांगणार आहे. भिडे-एकबोटे याना अद्दल घडवली पाहिजे असं त्यांनी   सांगितली . 
तसेच शिवसेनेचे सनातन धर्म संस्थेला कधी पाठिंबा दिला नाही. महाराष्ट्रात शांतता ठेवायची असेल तर अशा  लोकांवर कारवाई घायला हवी. काँग्रेस काळात कारवाई झाली नाही हि आमची चूक होती. महाराष्ट्रात पुरोगामी सरकार आलेले आहे. आता याबाबत स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. दोभोलकर , पानसरे यांच्यासारखी मानस मारली जातात, त्यांच्यामागे कोण सूत्रधार आहे, ते शोधून काढलं पाहिजे. सनातन संस्थेचे जे लोक बोलतात त्यावरून हे स्पष्ट होतंय,सरकार नक्की या संबंधात विचार करेल असा विश्वास काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केली. 
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मिट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थागिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आंदोलकांवरील गुन्हेही गे मागे घेतली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारानंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत भीक-कोरेगाव दंगल प्रसंगी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here