जयंती नाल्यामधून प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत : शुद्धीकरणाचे तीन पंप बंद

0
88
jayanti nala

जयंती नाल्यामधून प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत : शुद्धीकरणाचे तीन पंप बंद 

कोल्हापूर: जयंती नाल्यातून प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. हि गोष्ट प्रजासत्ताक सेवा संस्थेच्या दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. येथील पाहणी केली असता सांड पाण्यावर प्रक्रिया करणारे एकूण सहा पैकी पाच पंप बंद असून एका पंपावरच प्रक्रिया सुरु असल्याचे आढळले. 

जयंती नाला येथील पंपिंग स्टेशनजवळील बंधाऱ्याकडून गेल्या काही दिवसांपासून पुन्हा दूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. कलशेट्टी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रार केली. 

याची गंभीर दखल घेत प्रशासनाने शनिवारी जयंती नाला परिसराची पाहणी केली. यावेळी पंपिंग स्टेशन मधील सहा पंपांपैकी पाच पंप बंद आहेत. यामधील चार पंप अगोदरच बंद होते. १८ डिसेंबरला उर्वरित एका पंपामध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे एका पंपावर कामकाज सुरु आहे. यामुळेच प्रक्रिया न करताच प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत दूषित पाणी जात असल्याचे समोर आले.