विराट कोहलीने महेंद्र सिंग धोनीसाठी केलेले ट्विट ठरले सर्वात हिट

0
73
MS_Dhoni

विराट कोहलीने महेंद्र सिंग धोनीसाठी केलेले ट्विट ठरले सर्वात हिट…… 

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहनीच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा आज खोवला गेला आहे. कारण क्रीडा विश्वात धोनीच्या शब्दाला किती मन आहे, पुन्हा एकदा दिसून आले. 

 

जगभरात अब्जावधी लोक ट्विटरवर आपल्या पोस्ट करत असतात. ट्विटरने या वर्षात सर्वाधिक लोकप्रिय ट्विटची यादी जाहीर केली आहे. यामध्ये क्रीडा विश्वात कोहलीचे ट्विट सर्वाधिक लोकांच्या पसंतीस उतरले असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण कोहलीचे ट्विट नेमके काय होते तरी काय, याचा विचार आता तुम्ही करत असाल…… 

या पुरस्कारांमध्ये वर्षातील सुवर्ण ट्विट हे भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठरले आहे. मोदी यांनी ‘ सबका साथ +सबका विकास + सबका विश्वास =विजयी भारत ‘ असे ट्विट या वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय ट्विट ठरले होते

. कोहलीने ७जुलै या दिवशी एक ट्विट केले होते. या दिवशी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिग धोनीचा वाढदिवस होता. कोहलीने यावेळी त्याच्याबरोबर धोनीचा असलेला एक फोटो शेअर केला होता. या फोटोखाली कोहनीने लिहिले होते कि , “ माही, वाढविवासाच्या हार्दिक शुभेच्छा .फार कमी व्यक्तींना विश्वास आणि सन्मान याचा अर्थ समजतो. मला आनंद आहे कि, बऱ्याच वर्षांपासून माजी आणि धोनीची मैत्री आहे. मी या पूर्वीहि म्हटले आहे कि , तू आम्हा सर्वांचा मोठा भाऊ आहेस, तू नेहमीच माझा कर्णधार राहशील .”