उन्नाव पीडितेचा अखेर मृत्यू

0
67
unnaojpg

उन्नाव पीडितेचा अखेर मृत्यू 

नवी दिल्ली : 

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी रात्री ११. ४० वाजता उपचार सुरु असतं मृत्यू झाला. गुरुवारी तिला विशेष विमानाने उखनौहुन दिल्लीला आणले होते. ती व्हेंटीलेटरवर होती. शिवम त्रिवेदी या भावाच्या मित्राने तिला लग्नाचे वचन दिले होते. आणि मंदिरात नेऊन शुभमसह तिच्यावर इतंरानी सामूहिक बलात्कार केला होता. बलात्काराचा विडिओ करून तिला बॅकमेल करण्याचा धाक दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तिने अखेर फिर्याद नोंदवली. दोनच दिवसापूर्वी आरोपी जमिनीवर सुटले होते. आणि ती सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्यासाठी जात होती. वाटेतच तिच्यावर हल्ला झाला . 

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये जामिनावर सुटलेल्या सामूहिक बलात्कारात आरोपीनी  फिर्यादी युवतीला जिवंत पेटवले होते. पीडिता ९० टक्के भाजलेली होती. तिची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होत असताना शुक्रवारी रात्री ११. ४० वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. 

गुरुवारी तिला विशेष विमानाने लखनौ हुन दिल्लीला आलेले होते. ती व्हेंटीलेटरवर होती.  सफदरजंग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुनील गुप्ता यांनी सांगितले कि, आमचे प्रयत्न सुरु होते. पण हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती होती. ती ९० टक्के जळालेली होती. जखमा खोल होत्या. 

शिवम त्रिवेदी या भावाच्या मित्राने तिला लग्नाचे वचन दिले होते. आणि मंदिरात नेऊन शुभमसह इतरांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्काराचा व्हिडीओ करून ब्लॅकमेल करण्याचा धाक दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तिने अखेर फिर्याद नोंदवली. दोनच दिवसापूर्वी आरोपी जामिनावर सुटले होते. आणि ती सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्यासाठी जात होती. वाटेतच भल्या पहाटे या आरोपींनी  तीच्यावर चाकू हल्ला केला आणि नंतर तिला जिवंत पेटवून दिले. शिवम त्रिवेदी , त्याचे वडील रामकिशोर ,शुभम त्रिवेदी तसेच हरिशंकर आणि उमेश वाजपेयी हे या प्रकरणातले अन्य आरोपी आहेत. हैद्राबाद शूट आऊट घटनेनंतर काही तासातच तिने जगाचा निरोप घेतला. 

  • मी मेले तर …… 

गुरुवारी सायंकाळी पीडित इथे दाखल झाली तेव्हा ती शुद्धीत होती. ती भावाला उद्देशून म्हणाली  , ‘ मी वाचेन का रे दादा ? मला मरायचे नाही आणि समज मी मेले तर माझ्या गुन्हेगारांना सोडायचे नाही तू . सूड घ्यायचा.