स्वच्छता अँपच्या माध्यमातून घरबसल्या करता येणार तक्रारी

0
72
swachata app

स्वच्छता अँपच्या माध्यमातून घरबसल्या करता येणार तक्रारी. 

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत सुरू केलेल्या ‘ स्वच्छ अँप ‘२० हजार लोकांना डाउनलोड केल्याचा अंदाज आहे. याचा वापर करून तक्रारींचे ४८ तासात निराकरण केले जाते. स्वच्छ  भारत सर्वेक्षणात २०२० स्पर्धेत हे अँप शहराला अव्वल ठरविण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. 

घरबसल्या कचरा उठाव आणि सामाजिक स्वच्छतेबाबत नागरिकांत सजगता निर्माण करणाऱ्या या स्वच्छ अँपचा वापर नागरिकांनी करावा, त्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे असे आयुक्त डॉ . मल्लिकानाथ कलशेट्टी यांनी दिली. 

सर्व अँड्रॉइड मोबाईलचे प्ले स्टोअरमधे हे अँप मोफत उपलब्ध आहे. या अँपद्वारे नागरिकांत घरबसल्या आपल्या परिसरातील कचरा उठाव साफसफाई संबधी मोबाईल द्वारे तक्रारीस मुभा आहे. नागरिकांकडून घरबसल्या आपल्या परिसरातील संबंधित वार्डातील आरोग्य निरीक्षकांकडे जाते. यानंतर ४८ तासात निराकरण केले होते . या अँपच्या माध्यमातून घंटागाडी, कचरा उठाव, मृत जनावरे आदींबाबत तक्रार नोंदवता येते. तसेच निराकरण झाल्यानंतर नागरिकांना अभिप्राय देण्याची सोय आहे. याची नोंद थेट राज्य शासनाकडून ठेवली जाते. यामाध्यमातून गुणांकन पद्धतीनुसार महापालिकेला घेऊन देऊन स्वच्छ  भारत अभियानात शहर बक्षिसास पात्र ठरणार आहे. 

कोणत्याही शहरात १०० %कचरा उठाव शक्य नसला तरी आपले शहर स्वच्छ  ठेवण्यासाठी नागरिकांना या अँपचा वापर करून यंत्रणेला सजग करता येणार आहे. हे अँप अभियान व स्पर्धेपुरतं सुरु ना ठेवता कायम स्वरूपी राहील . या माध्यमातून आलेल्या स्वच्छतेविषयक तक्रारींचे निराकरण जलद व्हावे, यासाठी कटाक्ष असल्याचे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सांगितलं. दरम्यान , राज्य शासनाने राज्यातील ‘ ड ‘ वर्ग महापालिकेसाठी स्वच्छ प्रभाग या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी शहरातील सर्व प्रभागणी सहभाग नोंदवला आहे. .स्वच्छ अँप अधिकाधिक नागरिकांनी डाउनलोड करून त्याचा वापर करण्याची गरज आहे. 

उपयोग सिद्ध 

अँपच्या माध्यमातून कचऱ्याबाबत आलेल्या तक्रारींचे निराकरण झाले किंवा नाही याचे वरिष्ठांकडून पडताळणी केली होते. एकप्रकारे अँपच्या माध्यमातून शहतातील कचऱ्यावर वरिष्ठांचा लक्ष राहाते . त्यामुळे स्वच्छ अँपच्या बाबतीत यंत्रणाही सतर्क राहते. यापूर्वी या अँपची उपयोगिता सिद्ध झाली आहे.