वसंतदादा बँकेच्या मुख्य इमारतीचा १० कोटी ७२ लाखांना लिलाव

0
106
vasntdadad-bank

सांगली: वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेची मुख्य इमारत डेक्कन इन्फ्रा कंपनीला १० कोटी ७२ लाख ५२ कोटी हजार रुपयांना विकण्यात येणार आहे. मिरजेतील स्टेशन रोडवरील जागा हि ८० लाखांना विकण्यात येणार आहे. तसेच मुंबई आणि अन्य चार इमारतीचे लिलाव रद्द करण्यात आला आहे. 

वसंतदादा बँकेच्या सांगली- मिरज रस्त्यावरील मुख्य इमारत , तसेच सराफ कट्टा, वखारभाग, मिरज व मुंबईतील परेल येथील ६ जगाची लिलाव प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी वखारभाग येथील धर्मरत्न कॉम्प्लेक्स मधील इमारत वखारभाग येथील गांधी बिल्डिंगमधील गाळा व सराफ कट्टा पेठ भाग इमारत विक्री साठी किमान तीन निविदा आल्या नसल्यामुळे तो लिलाव रद्द करण्यात आला आहे. 

विभागीय सहकार सहनिबंधक [ कोल्हापूर] यांच्या कार्यालयात मंगळवारी मुख्य इमारतीसाठी चार जणांनी निविदा भरल्या होत्या. त्या चार पैकी तीन निविदा ह्या किमान किमती पेक्षा कमी रकमेच्या होत्या. डेक्कन इन्फ्रा कंपनीची निविदा किमान किमती पेक्षा थोडी जास्त होती. आणि याचमुळे इन्फ्रा कंपनीला हि इमारत विक्रीचा निर्णय अवसायक यांच्याकडून हि इमारत खरेदी पत्र करून देण्यात येणार आहे. 

दरम्यान , मिरज स्टेशन रोडवरील जागा खरेदीसाठी तिघांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी इरफान महंमदइसाक खान यांची निविदा सर्वाधिक म्हणजे ८० लाखांची असल्यामुळे हा इमारत खान याना विक्री करण्यात येणार आहे. 

मुख्य शाखा सुमारे १६ चौरस फूट जागेत बांधलेली आहे. सांगली -मिरज मुख्य रस्त्यावर सुसज्ज व अत्याधुनिक पद्धतीने बदलेल्या इमारतीची केवळ १० कोटी ७२ लाखाना विक्री होणार असल्याने ठेवीदार संघटनेने या लिलावाला विरोध केला आहे. हि लिलाव प्रक्रिया तातडीने थांबवावी आणि संपूर्ण कर्जाची वसुली आणि  चौकशी झाल्यानंतर या इमारती विकाव्यात, अशी मागणी ठेवीदार संघटने तर्फे प्रदीप बर्गे यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे केली आहे.