गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण , तुळजाभवानी प्रभागातील प्रकार

0
72
water-contamination-lawyer

गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण , तुळजाभवानी प्रभागातील प्रकार 

कोल्हापूर  : महापालिकेच्या तुळजाभवानी मंदिर प्रभागातील नागरिकांना गेल्या काही महिन्यापासून गढूळ पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहार. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने त्यांची दखल घेतली नाही त्यामुळे प्रभागाचे नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी थेट आयुक्त डॉ. मल्लिकानाथ कलशेट्टी यांच्याच मोबाइलवर तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. 

  तुळजाभवानी मंदिर प्रभागातील ११ कॉलनीमध्ये तसेच साने गुरुजी वसाहती मधील काही कॉलनीमधील गेल्या अनेक महिन्यापासून गठुळ पाणीपुरवठा होत आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा १५ दिवस बंद पडला होता . त्यानंतर तो सुरु झाला :पण अनेकांच्या नळाद्वारे गढूळ पाणी येऊ लागले. 

`नळाला येणारे पाणी प्रक्रिया ना करता थेट नदीतून उचलून सोडले जाते कि काय, इतके लालभडक पाणी नळाला येते. कधीकधी काळपट पाणी येते . एखादी कळशी पाण्याने भरून ठेवली कि संध्याकाळपर्यँत लालभडक मातीचा थर तिच्या तळाला साचलेला असतो. 

या गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गॅस्ट्रो तसेच अन्य पोटाच्या विकारांनी नागरिक हैराण होऊ लागले आहेत. खासगी दवाखान्यात उपचाराला येणाऱ्या दहा पैकी आठ रुग्ण पोटाच्या विकाराचे आहेत. त्यामुळे नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे. 

पाण्यातील माती जाऊन नागरिकांचे फिल्टरहि खराब होत आहेत. 

गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या या गढूळ पाणी पुरवठ्याबाबत नागरिक प्रभागातील नगरसेवक राजू दिंडोर्ली यांच्याकडे तक्रार करीत आहात. दिंडोर्ले हे संबंधित शाखा अभियंता यांच्याकडे  तक्रारकरतात.अधिकारीएकूणघेतात.पणकामकाहीचकरीतवारंवारतक्रारीकरूनहीअधिकारीत्याकडेदुर्लक्षकरीतआहेत.त्यामुळे नगरसेवक दिंडोर्ले यांनीही अधिकाऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

गुरुवारी नगरसेवक दिंडोर्ले यांनी प्रभागातील नागरिकांना आयुक्त्याकडे तक्रार करण्याचे आव्हान केले. पाणी गढूळ.ल कमी दाबाने येने, वेळेवर व येणे. अशा प्रकारच्या तक्रारी होत असून मी वारंवार अभियंता , उपजलं अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करतो आहे. परंतु त्यांच्याकडून तितकाच प्रतिसाद मिळत नाही. आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणे गरजेचं आहे. पण त्या आधी नागरिकांनी आयुक्ताकडे तक्रारी कराव्यात ,असे आवाहन केले आहे.