कर्नाटकात येडियुरप्पा सरकार तरले : काँग्रेस-निजदला धक्का

0
66
yeddyurappa government

कर्नाटकात येडियुरप्पा सरकार तरले : काँग्रेस-निजदला धक्का 

 

बंगळूर: 

कर्नाटक विभासभेच्या १५ जागांच्या पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १५ पैकी ६ जागांवर भाजपने विजय मिळवला असून ६ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. यामुळे बी . एस येडियुरप्पा यांच्या सरकासमोरील धोका टळला आहे, येडियुराप्पा हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 

तर काँग्रेस ने दोन जागा जिंकल्या आहेत. तर निजदने पाठिंबा दिलेल्या एक अपक्ष उमेदवाराने मोठ्या माताधिक्क्याने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. 

  भाजपसाठी हि पोटनिवडणूक महत्वाची होती. २२३ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत १११२ हा बहुमताचा आकडा आहे, मात्र, भाजपकडे १०४ आमदाराचे संख्याबळ आहे. काही अपक्षांचाही भाजपला पाठिंबा आहे. यासाठी बहुमतासाठी भाजपला पोट निवडणुकीत किमान सात जागांवर विजय हवा होता.मात्र , भाजपने १५ पैकी १२ जागांवर मुसंडी मारली आहे. यामुळे येडियुराप्पा सरकार तरले आहे. 

  मतदारांनी जो निकाल दिला आहे, त्यामुळे आपण आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया येडियुराप्पा यांनी दिल्ली. आता कोणत्याही अडथळ्याशिवाय आम्ही लोकहिताचे आणि स्थिर सरकार देऊ शकतो. अशी अशा अशा त्यांनी व्यक्त केली . 

दरम्यान , काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला आहे. जनतेने दिलेला जनादेश आम्हाला मान्य आहे. आम्ही पराभव स्वीकारत आहोत. आम्ही नाराज झालेलो नाही, असे कर्नाटकचे काँग्रेसचे संकटमोचक डी . के . शिवकुमार यांनी म्हण्टलं आहे. 

के . आर. पेटे. मतदारसंघातून अपात्र ठरविण्यात भाजपचे के. सी. नारायण गोंडा विजयी झाले आहेत. त्यांनी निजदचे बी. एल. देवराज यांचा पराभव केला. 

कालवाड मतदारसंघातून भाजपचे श्रीमंत पाटील विजयी झाले आहेत. तर चिक्कबळळ पूर येथून डॉ. सुधाकर, यल्लापूर येथून देवराज याचा पराभव केला. 

भाजपने १३ जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. तर काँग्रेसने किमान १२ जागा मिळतील असे सांगितले होते. निजदला ५ जागांची अपेक्षा होती, मात्र, १२ जागांवर भाजपने मुसंडी मारली आहे. हा काँग्रेस-निजदसाठी धक्का मानला जात आहे. 

काँग्रेस-निजदसाठी आघाडी सरकार अस्तित्वात असताना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी या दोन्ही पक्षातील सतरा आमदारांना तत्कालीन सभापतींनी अपात्र ठरवले यापैकी १५ मतदार संघात पोटनिवणूक घेण्यात आली.