कोल्हापूरनंतर आता इचलकरंजीत मटण दरवाढीवरून आंदोलन; प्रांत कार्यालयावर मोर्चा

0
115

इचलकरंजीत मटण दर ४८० रुपये निश्चित करण्यात यावा, या मागणीसाठी इचलकरंजी नागरिक मटण समन्वय कृती समितीच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

कोल्हापूरनंतर आता इचलकरंजीत मटण दरवाढीच्या प्रश्नावरून रान तापले आहे. इचलकरंजीत मटण दर ४८० रुपये निश्चित करण्यात यावा, या मागणीसाठी इचलकरंजी नागरिक मटण समन्वय कृती समितीच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

कोल्हापुरात मटण दरवाढीच्या प्रश्नावरून याआधी रान तापले होते. दरवाढीच्या विरोधात नागरिक आणि दरवाढीच्या समर्थनार्थ व्यापारी यांच्यात याआधी आंदोलने झाली.

कोल्हापुरात मटण दरवाढीविरोधात कृती समितीने आंदोलन पुकारले होते. याबाबत विक्रेते आणि कृती समितीचे पदाधिकारी यांच्यात चर्चा होऊन ५२० रुपये दराने मटण विक्री करावयाची, असा तोडगा काढण्यात आला होता; पण काही विक्रेते जादा दराने मटण विक्री करतात, अशा तक्रारी कृती समितीकडे येत आहेत.