फेसबुक फ्रेंडशीप पडतेय महागात; अशी होतेय महिलांची फसवणूक

0
124

कात्रज परिसरातील आंबेगाव परिसरात राहणाऱ्या 59 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची फेसबुकवर एका व्यक्तीबरोबर ओळख झाली. त्यानंतर परदेशात नोकरी करीत असल्याचे सांगून त्या व्यक्तीने फिर्यादीस परदेशातून महागड्या भेटवस्तू पाठविल्याचे सांगितले. मात्र, दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागाने त्या अडविल्याचे सांगितले. त्या सोडविण्यासाठी त्याने या महिलेला 15 लाख रुपये वेळोवेळी एका बँक खात्यावर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.

विमाननगर परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेची देखील अशीच फसवणूक झाली. या महिलेशी एका अनोळखी व्यक्तीने फेसबुकवद्वारे मैत्री वाढविली. आपण लंडनला राहात असून तेथून तुला महागडे गिफ्ट पाठविल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर ते गिफ्ट मिळविण्याचा बाहणा करून त्याने या महिलेस वेगवेगळ्या बॅंक खात्यांमध्ये 17 लाख 74 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.