भारत पाठविणार वैद्यकीय मदत; नागरिकांना मायदेशी आणणार

0
94

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पसरलेली अत्यंत जीवघेणी साथ आटोक्यात आणण्यासाठी भारत चीनमधील वुहान शहरात या आठवड्याच्या अखेरीस एका विशेष विमानाने वैद्यकीय मदत पाठविणार आहे. वुहानमध्ये अडकलेल्या भारतीय , तसेच शेजारी देशांतील नागरिकांपैकी काही जणांना या विमानातून भारतात आणले जाईल, असे चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांनी सांगितले.ते म्हणाले की, भारतातून वुहानला वैद्यकीय मदत घेऊन जाणाऱ्या विमानात मर्यादित आसनक्षमता आहे. त्यामुळे तिथून काही जणांनाच परत आणणे शक्य होणार आहे. चीनमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सध्या मास्क, ग्लोव्हज, सुटस् यांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. चीनमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून मास्कची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने व उत्पादन कमी असल्याने तिथे या गोष्टीचा तुटवडा निर्माण झाला आहे. चीनमधील हुबेई प्रांत व त्याची राजधानी वुहान शहरातून सर्वप्रथम कोरोना विषाणूची लागण होण्यास सुरुवात झाली.त्यानंतर ही साथ जगभरात अनेक देशांत पसरली आहे. चीनमध्ये हुबेईसह ३१ प्रांतांमध्ये कोरोनाची साथ पसरली असली तरी तिचा सर्वात जास्त जोर वुहान शहर व परिसरातच आहे. वुहान शहरात अडकलेल्या ४०० हून अधिक भारतीयांना काही दिवसांपूर्वी तिथून विशेष विमानाने भारतात परत आणण्यात आले. त्यांच्यापैकी एकालाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले.१२ औषधांच्या निर्यातीवर बंधने येणारच्चीनमधील हुबेई प्रांतात कोरोना विषाणूच्या साथीने हाहाकार माजविला असताना, त्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सावधगिरीचा उपाय म्हणून १२ अत्यावश्यक औषधांच्या निर्यातीवर काही बंधने लादण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे.च्यात अँटिबायोटिक, व्हिटॅमिन, हॉर्मोन्स या प्रकारातील औषधांचा समावेश आहे. औषधांच्या निर्मितीमध्ये लागणाºया घटकांचा पुरवठा चीनच्या वुहान प्रांतातून भारतामध्ये होतो. तिथे कोरोनाच्या साथीमुळे सर्व उद्योगधंदे सध्या बंद आहेत. त्याचा भारतातील औषधनिर्मिती व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे.