उद्धव ठाकरेंना किती मार्क देणार? शरद पवार म्हणतात..

0
92

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे चालणार यात मला शंका वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी वरील मत व्यक्त केले. सरकारचं नेतृत्व करणा-या व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असते, त्यांची भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे असे पवारांनी म्हटले आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, की हे तीन पक्षांचे सरकार आहे. १९७८ मध्ये मी किती पक्षांचं सरकार चालवलं हे मला आठवत नाही. शरद पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने कारभार करत आहेत, त्याला किती मार्क द्याल? असे विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, मार्क देण्यासाठी परीक्षेची वेळ अजून आलेली नाही, पण त्यांचा मार्ग योग्य आहे. इतरांना काम करण्यासाठी संधी देत आहेत. प्रोत्साहनही देत आहेत ही चांगली गोष्ट आहे.