कोल्हापुरात सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्ण वाढले; आणखी २ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

0
100

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज, शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांत वाढ झाली. सीपीआरमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात इचलकरंजी येथील २३ वर्षाचा एक पुरुष आणि कोल्हापूरमधील ३० वर्षाच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

काल, गुरुवारी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज पुन्हा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे जिल्हा प्रशासन हादरले आहे.

मुंबईतच कोरोना पॉझिटिव्ह आलेला ३५ वर्षीय तरुण आणि त्याची १० वर्षीय मुलगी तपासणीसाठी सीपीआरच्या रांगेत उभे राहिल्याचा खळबळजनक प्रकार काल गुरुवारी रात्री उघडकीस आला होता. या प्रकाराने प्रशासनाची तारांबळ उडाली. या दोघांसह चौघांना ताब्यात घेऊन सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या चौघांचेही आता नव्याने स्वॅब घेण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच जिल्ह्याबाहेरून येणार् यांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे जिल्ह्याचा धोका वाढत असतानाच जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.